Chhatrapati Shahu Maharaj

Welcome to Shahumaharaj.com
Go to content
Chhatrapati Shahu Maharaj of Kolhapur; the most popular Maratha King with a revolutionary vision. He was a social reformer to work for rural and low-caste indigent by providing them free education along with hostel facility in Kolhapur state. Even in today’s era, his foresight can be seen everywhere while considering development of Kolhapur, Maharashtra and India as well. This website is a small initiative to spread the greatness of the visionary king. After 100 years, when not a single thought of Chhatrapati Shahu Maharaj has become anachronistic, his vision & strategies are still as fresh as the blooming flower in the midst of nature. During a short life span and his tenure as a Chhatrapati, he has marked his works in the history of our nation and a mankind as welll.

Kolhapur; a branch of a royal Maratha kingdom of Chhatrapati Shivaji Maharaj; is blessed by the goddess of health, wealth, prosperity and peace Shri Mahalaxmi (Ambabai) who is also known as the mother of this universe. Kolhapur is the land where you find nature that is exquisitely beautiful, animals that are rare, and people who are proud and inviting. It is the land of the mighty river Panchaganga (Confluence of five rivers) and an Indian Gaur (Bison) who resides in Western Ghats. Kolhapur is a beautiful and diverse region with an incredible range of cultures and landscapes located in the world famous Western Ghats of India. It shares its borders with Karnataka, Goa & Konkan. All along this region you will find many green ways passing through Western Ghats. Satara lies to Kolhapur’s North and Sangli to East. Previously Kolhapur was a separate Maratha Empire for many decades and a princely state during British government. Kolhapur became a part of Independent India and was absorbed into it during 1947 to 1949. It is known for its rich biodiversity. Kolhapur has successfully conserved its bio diversity, along with the tiger and numerous species of birds, and it provides a large number of Indian Bison in a protected sanctuary.

But apart from all other things anything about Kolhapur is shortened without mentioning Chhatrapati Shahu Maharaj’s name. Truly, he was an architect of modern Kolhapur.

Hope to see you supporting this endeavour.

Special thanks to Dr. Jaysingrao Pawar and Dr. Ramesh Jadhav; senior historians, ideal scholars of biography of Chhatrapati Shahu Maharaj.

- Team, Shahumaharaj dot com
हे माझे पवित्र कार्य आहे
एका बाजूवर शाहू महाराज, जातीभेद मोडून आपण सर्व एक होऊया असे म्हणत, तर दुसऱ्या बाजूवर समाजातील मागासलेल्या जातींसाठी खास सवलती देत; त्यांच्यासाठी स्वतंत्र वसतिगृहे स्थापत. त्यांचे असे करणे म्हणजे जातीभेद व जातीमत्सर वाढवणे नाही काय, असा आरोप विरोधक करत. हा आरोप खोडून काढताना महाराज म्हणत,"मागे पडलेल्याना मी सारखे, म्हणजे एका जातीचे समजतो व त्यांना वर आणण्याचा प्रयत्न करतो. हे माझे पवित्र कार्य आहे असे मी समजतो. असे मी न करीन, तर मी कर्तव्यविन्मुख झालो, असे माझे मन मला टोचील. या मागासलेल्या जातीला वर आणण्याचे प्रयत्न झाले नाही, तर जातीभेदाचे कट्टर अभिमानी वीर, तिला दडपून टाकल्याशिवाय राहाणार नाहीत. यासाठी मागासलेल्यांचा कैवार घेणे, हे जातीद्वेष वाढवणे नव्हे, हे उघड आहे." हा कैवार म्हणजे एखाद्या डॉक्टर ने अशक्त व दुबळ्या मुलास अन्न व औषधे देऊन, त्याला धडधाकट मुलांच्या जोडीला आणून बसवण्यासारखा असतो; यात पंक्तिप्रपंचही नाही अथवा जातीमत्सर वाढवणेही नाही, असे त्यांनी एके ठिकाणी म्हंटले आहे.

- जातीभेद निवारण चळवळ
राजर्षी शाहू छत्रपती जीवन व कार्य.
डॉ. जयसिंगराव पवार
----------
कोल्हापूरचा इतिहास डोळ्यासमोर ठेवल्यास सर्वप्रथम जर कोणती व्यक्ती सर्वांच्या डोळ्यासमोर येत असेल तर ती म्हणजे राजर्षी शाहू महाराज ही होय. शाहू महाराज राजे असून देखील ऋषितुल्य होते, म्हणूनच त्यांना कुर्मी येथील आर्य क्षत्रिय परिषदेमध्ये राजर्षी या उपाधीने सन्मानित करण्यात आले. अशा या ऋषितुल्य राजाने आपल्या कार्य-कर्तृत्वाने कोल्हापूरचे नाव भारताच्या नकाशावरच नव्हे तर संपूर्ण जगाच्या नकाशावर अजरामर केले आहे. राजर्षींनी १८९४ ते १९२२ या आपल्या फक्त २८ वर्षांच्या अल्प कालावधीत कोल्हापूर संस्थानात केलेल्या विकासाची गॉड फळे आज सुद्धा फक्त कोल्हापूर जिल्हाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र चाखत आहे.
युगायुगीन करवीर
भारतीय इतिहास संशोधन समिती, कोल्हापूर.
----------
Back to content